Solar Pump Yojana : सौर पंपासाठी अर्ज भरायला सुरू ? परंतु शेतकऱ्यांची अर्ज करताना दमछाक..!!!

Solar Pump Yojana : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या वेबसाईट वरती तर आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनेचा आढावा घेत असतो आणि सरकारने जाहीर केलेल्या घोषणा केंद्र सरकार असेल व राज्य सरकार असेल सरकारने ज्या योजना आणलेल्या असतात त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही काम करत असतो म्हणून शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय असणारी जी योजना आहे ती कुटुंब योजना याच्याबद्दल तुम्हाला आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत चला तर पाहूयात काय आहे.

Solar Pump Yojana
Solar Pump Yojana

Solar Pump Yojana : प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना चा टप्पा दुसरा याचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही 17 मे 2023 पासून चालू झालेली आहे आणि या योजनेमध्ये अर्ज करत असताना शेतकऱ्यांना भरपूर अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे तर काय आहे. आणि ही योजना मध्ये अर्ज करत असताना कुसुम महाऊर्जाच्या {kusum mahaurja com solar} अंतर्गत या योजनेमध्ये अर्ज चालू आहेत आणि अर्ज भरण्याची ही प्रक्रिया चालू आहे.

Solar Pump Yojana : परंतु संकेतस्थळावर अर्ज करताना शेतकऱ्यांना खूप सार्‍या अडचणी येत आहेत. सारखे-सारखे संकेतस्थळ लोड करूनही संकेतस्थळ सुरू होत नाही. जेव्हा संकेतस्थळ सुरू झाले तोपर्यंत जिल्ह्यातील कोटा संपला असे दर्शवण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांची सुरू आहे परिणामी हजारो शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सोलार पंप निवडण्याची आजची शेवटची तारीख संध्याकाळपर्यंत भरा अर्ज…

Solar Pump Yojana : 17 मे 2023 रोजी जिल्हा निहाय कोठा उपलब्ध करून दिला आहे. हा कोर्टा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पोर्टल बंद करण्यात येणार आहे. शेतीपंपाचे सौर ऊर्जा करण करण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना (Kusum Solar Pump Yojana) सुरू केली आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख 18 हजार 897 शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन दाखल केले होते. त्यापैकी 70 हजार 529 शेतकऱ्यांनी सौर पंपाची रक्कम भरलेली आहे. तर 59 हजार 659 शेतकऱ्यांनी सौर पंप पुरवठादारांची निवड केली आहे त्यामुळे हे पंप बसवले जातील.

Solar Pump Yojana : खुला गटातील लाभार्थ्याला तीन एचपी पंपासाठी 19380 रुपये तर पाच एचपी पंपासाठी 26975 व साडेसात एचपी पंपासाठी 37 हजार 440 रुपये रक्कम भरावी लागते. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती साठी तीन एचपी पंपासाठी 9690 पाच एचपी पंपासाठी 13488 व साडेसात एचपी पंपासाठी १८७२० रुपये एवढी रक्कम भरावी लागते.

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ दोन वेळा घेता येणार नाही त्यामुळे यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन अर्ज सादर करू नये असे आवाहन महाऊर्जामार्फत केले गेले आहे. या अगोदर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी जर अर्ज सादर केला तर त्यांचा अर्ज बाद केला जाईल.

2000 ची नोट अशीच बदलता येणार नाही

Solar Pump Yojana : प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना अंतर्गत कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषी पंप (Solar Pump Yojana) काढून ठेवतात आणि लाभ घेतला नसल्याचे दाखवून देतात आणि दुसरा सौर कृषी पंप बसून घेतात. अशाप्रकारे कुणी जर पंप बसून घेतल्यास त्यांचा सौर कृषी पंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिशाची रक्कम जप्त केली जाईल असे महाऊर्जा ने सांगितले आहे. व अशा शेतकऱ्यांवर गुन्हा ही दाखल करण्यात येणार आहे.

अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करताना खूप सारे अडचणी येत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुरक्षित गावांच्या यादीमध्ये कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत पंप मंजूर करण्यात येत आहेत. अनेक गावांची नावे सुरक्षित गावांच्या यादीमध्ये नसल्याने या गावातील शेतकरी सौर पंप घेण्यास पात्र होत नाहीत. परंतु हे शेतकरी डिझेल पंप वापरत असतील तर त्यांना सौर पंप बसवून देण्यात येतील असे अर्ज भरताना सांगण्यात येत आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट होतो ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे तर नक्कीच तुम्हाला आढावा आणि नवनवीन बातम्या तुमच्या मोबाईल वरती दररोज अगदी मोफत फ्री मध्ये मिळवायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या दिलेल्या लिंक वरती जाऊन व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा धन्यवाद.

Leave a Comment